मुंबई विद्यापीठ निकाला देण्यात नापास, तिसरी डेडलाइनसुद्धा संपली

मुंबई विद्यापीठ निकाला देण्यात नापास, तिसरी डेडलाइनसुद्धा संपली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठाची तिसरी डेडलाइनसुद्धा संपली. त्यामुळे विद्यार्थांची चिंता अधिक वाढली. 245 शिक्षकांनी 6148 उत्तरपत्रिका तपासल्या आहेत.

 

कालपर्यंत एकूण 333 विषयांचे निकाल लागले आहेत. राज्यपालांनी दिलेल्या डेडलाईन पाळू न शकल्यानं कुलगुरू संजय देशमुख यांनी स्वत: 15 ऑगस्टपर्यंत सर्व निकाल लावण्याचं आश्वासन दिलं होतं.

 

मात्र, 15 ऑगस्टच्या दिवशी फक्त दोनच विषयांचे निकाल लावण्यात आले असून अजून 144 विषयांचे निकाल बाकी आहेत. आतापर्यंत 1 लाख 63 हजार 245 उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहे.

 

तर 15 ऑगस्टच्या दिवशी 245 शिक्षकांनी 6 हजार 148 उत्तरपत्रिका तपासल्या आहेत. तसंच आतापर्यंत एकूण 333 विषयांचे निकाल लागले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version