महागाईविरोधात शिवसेनाचा एल्गार; आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेतेही उतरले रस्त्यावर

महागाईविरोधात शिवसेनाचा एल्गार; आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेतेही उतरले रस्त्यावर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महागाईविरोधात शिवसेनेने राज्यव्यापी आंदोलन केले आहे. महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. सत्तेत असलेल्या सेनेने याआधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. आता पेट्रोल दरवाढ आणि महागाईविरोधात शिवसेनेने सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करत मोर्चे काढले आहेत.

 

देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले. भाजीपाला महागला, जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप उसळला आहे. महागाईचा तीव्र निषेध करत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरले आहेत.

 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मुलुंडपर्यंत, चर्चगेटपासून दहिसरपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागामधील हजारो नागरिक त्यात सहभागी होणार आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून हे मोर्चे, आंदोलने सुरू होणार झाले आहे. मोर्चांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

 

महागाईमुळे जनता बेहाल झाली आहे. नोटबंदी आणि GST मुळे देशाचा आर्थिक कणा मोडला आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली असल्याची प्रतिक्रिया मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.

 

या मोर्चामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर, सर्व नगरसेवक, शाखाप्रमुख, पदाधिकारी तसेच शिवसैनिक सामिल होणार आहेत. महिलांनी भाज्यांच्या माळा गळ्यात घालून सरकारचा निषेध केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version