एक वेणी घातल्यानं मुख्याध्यापिकेची विद्यार्थिनीला अमानुष मारहाण

एक वेणी घातल्यानं मुख्याध्यापिकेची विद्यार्थिनीला अमानुष मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दोन ऐवजी एक वेणी घातल्यानं विद्यार्थिनीला मुख्याध्यापिकेनं मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडलीय. शाळेत येताना दोन वेण्या घातल्या नाही आणि कॅनव्हासचे शूज घातले नाहीत, म्हणून या विद्यार्थिनीला मारहाण केलीय.

भक्ती म्हात्रे असं विद्यार्थिनीचं नाव असून मेधा कुलकर्णी असं मुख्याध्यापिकेचं नाव आहे. शाळा सुरु असाताना मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी या वर्गात राऊंडला आल्या होत्या आणि नियम न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून दोन दोन छड्या मारल्या. दरम्यान, याप्रकरणी पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version