मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी तारीख पे तारीख !

मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी तारीख पे तारीख !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

निकाल जाहीर करण्यासाठी 31 जुलैची डेडलाईन पाळण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई विद्यापीठाला आता 5 ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली.

 

पेपर तपासणीचा सर्व्हर डाऊन असल्यानं रखडलेले निकाल लावण्यात अडचणी येत आहेत. शिवाय घाईघाईत निकाल लावल्याने निकालाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह

निर्माण होत आहे.

 

171 अभ्यासक्रमांचे निकाल लागले असून अद्याप 306 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होणं बाकी आहे. त्यासाठी विद्यापीठाला 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय

घेण्यात आला. तसेच निकालासाठी महाविद्यालयांना देण्यात आलेली सुट्टी संपली असून आजपासून महाविद्यालयं सुरू झालीत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version