Mumbai Rain Update: मोठी बातमी! मुंबईवर अस्मानी संकट, तडकाफडकी जाहीर केल्या सुट्ट्या; लोकल रेल्वे सेवाही विस्कळीत

अचानक वाढलेल्या पावसामुळेअनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली
Mumbai Rain Update: मोठी बातमी! मुंबईवर अस्मानी संकट, तडकाफडकी जाहीर केल्या सुट्ट्या; लोकल रेल्वे सेवाही विस्कळीत

 गेल्या एका तासापासून मुंबईच्या पश्चिम उपनगरात अति मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अचानक वाढलेल्या पावसामुळेअनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. 

दरम्याने आता या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज दिनांक 4 जुलै रोजी दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

लोकल रेल्वे सेवेवर परिणाम
मध्य रेल्वेची CSMT कडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 25 ते 30 मी उशिराने, मध्य रेल्वेची कल्याण कडून CSMT कडे येणाऱ्या गाड्या 30 मी उशिराने तर  पश्चिम रेल्वेच्या विरार वरून चर्चगेट कडे येणाऱ्या गाड्या 25 मी उशिराने धावत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक 15 मी उशिराने धावत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version