Mumbai Rain Update: मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा, पुढील तीन तास महत्वाचे असणार; मंत्रालयाकडून ‘या’ सूचना जारी

Mumbai Rain Update : पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
Mumbai Rain Update: मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा, पुढील तीन तास महत्वाचे असणार; मंत्रालयाकडून ‘या’ सूचना जारी

Mumbai Rain Update: शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने मुंबई, वसई-विरार, पालघर, ठाणे,रायगड या जिल्ह्यांना झोडपले आहे. नंतर आज रविवार संध्याकाळपर्यंत देखील पावसाचा जोर कायम आहे. त्यात आता हवामान विभागाने या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांसाठी पुढील तीन तास महत्वाचे आहेत. कारण पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

30 सप्टेंबरपर्यंत सतर्कतेचा इशारा
हवामान विभागाकडून 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोरदार पावसामुळे शहरी पुराचा धोका असल्याचे राज्य आपत्कालीन केंद्राने सांगितले आहे.

हेही वाचा: Shivsena UBT Dasara Melava: शिवसेना ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहणार?, समोर आली मोठी माहिती

नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे. धोकादायक भागात जाणे टाळावे. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी. पुराच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे, पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे. पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

सतर्कतेचा सूचना 
घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच Flash Flood चा धोका निर्माण होऊ शकतो. नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी.
सर्व जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत ठेवावे.
सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करणे. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्ह्या इमारतीवर CSSR सीएसएसआरच्या दृष्टिने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
वीज व रस्ते पायाभूत सुविधा: दुरुस्ती पथक, साखळी आरें व फिडर संरक्षण युनिट तैनात करावे.
धरन निरीक्षण: कोकण व वरच्या खोऱ्यातील मध्यम धरनांसाठी दररोज आदळवा घेण्यात यावा.
जनतेसाठी माहिती प्रसार: आपत्ती पूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत असून, त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहावे.

जिल्हा व संपर्क क्रमांक
1. धाराशिव – 02472-227301
2. सोलापूर – 0217-2731012
3. बीड – 02442-299299
4. अहिल्यानगर – 0241-2323844
5. परभणी – 02452-226400
6. नांदेड – 02462-235077
7. लातूर – 02382 220201
8. रायगड – 8657752463
9. रत्नागिरी – 7057222333
10. पालघर- 02525 296074
11. सिंधुदुर्ग- 02362 228847
12. ठाणे- 9768338827
13. पुणे – 93710960061
14. सातारा- 02162 232349
15. मुंबई शहर आणि उपनगर- 9967 022 69403344.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version