जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रविवार निमित्त मुंबईच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक आहे, त्यामुळे मुंबईकरांनो आज गरज असेल तरच रेल्वेने प्रवास करा असंच म्हणावं लागेल. ठाणे ते कल्याणदरम्यान आज दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे.
अप धीम्या लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकात थांबणार नाहीत. या स्थानकात जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण स्थानकातून प्रवास करण्यास मुभा आहे, तर हार्बर आणि पश्मिम मार्गावर देखील मोगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.