‘मिशम 8 अवर्स’ ; मुंबई पोलिसांसाठी आनंदाची बातमी

‘मिशम 8 अवर्स’ ; मुंबई पोलिसांसाठी आनंदाची बातमी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 सतत ऑन ड्युटी असणाऱ्या मुंबई पोलिसांसाठी आनंदाची बातमी आहे. आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मुंबई पोलिसांना मोठं गिफ्ट दिले आहे. कारण मुंबई पोलिसांची ड्युटी आता 8 तासांची करण्यात आली आहे. ‘मिशन 8 अवर्स’ या कार्यक्रमात मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही घोषणा केली आहे. मुंबई पोलिसांना कामाचे तास नाहीत.

एकदा घरातून बाहेर पडलेला पोलीस कधी 12 तासांनी, कधी 16 तर कधी 24 तासांनी घरी परततो. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य, मानसिकता, कौटुंबिक आयुष्य या सर्वांवर त्याचा विपरित परिणाम होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपले कर्तव्य निभावताना पोलिसांना वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेता येत नाही. त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. मुलांना फारसा वेळ देता येत नाही. पण, आयुक्तांनी केलेल्या या घोषणेनंतर मुंबई पोलिसांना वैयक्तिक आयुष्याचा आनंद लुटता येईल, अशी आशा व्यक्त होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version