राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस

राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. ८ जून रोजी दोषारोपपत्र दाखल करण्याच्या कार्यवाहीसाठी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईतील खार पोलीस स्थानकानं ४ जून रोजी ही नोटीस राणा दाम्पत्याच्या मुंबई वांद्र्यातील निवासस्थानी पाठवली होती.

हनुमान चालीसा प्रकरणावेळी जेव्हा पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. आम्ही खासदार आमदार आहोत तुम्ही आम्हाला असं थांबवू शकत नाही, असंही ते म्हणाले होते. त्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा म्हणून एक गुन्हा दाखल झाला होता. त्या संबंधित ही नोटीस मुंबई पोलिसांनी त्यांना बजावली आहे. या प्रकरणी आयपीसीच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. येत्या ८ जून रोजी राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

राणा दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा केलेला निर्धार, यानंतर घेतलेली माघार, पोलिसांनी केलेली कारवाई या सर्व घडामोडीत अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल केला होता. यानंतर आता मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली असून, ८ जून रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version