9 वर्षांनतर पोलिसांना मिळणार बुलेटप्रुफ जॅकेट

9 वर्षांनतर पोलिसांना मिळणार बुलेटप्रुफ जॅकेट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई पोलिसांसाठी सरकारकडून गुड न्यूज आहे. दहशतवादी हल्ल्याच्या तब्बल 9 वर्षांनतर महाराष्ट्र पोलीस दलाने 5 हजार बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

 

जॅकेटची चंदीगड येथील केंद्रीय न्यायवैदकीय प्रयोगशाळेत चाचणी घेण्यात आली. मात्र, या जॅकेटची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात येणार असून जूनमध्ये पोलीस दलाला मिळणार आहे.

 

या बुलेटप्रुफची ऑर्डर कानपुर येथील एमकेयू कंपनीला देण्यात आलं असून ही कंपनी जर्मनीतून बुलेटप्रुफ जॅकेट उपलब्ध करून देणार आहे. तर एका जॅकेटची किंमत 32 हजार 474 रुपये

इतकी आहे.

 

राज्य पोलिस दलातील मुंबई पोलिस दल, क्युआरटी, फोर्स वन, राज्य राखीव दल, विशेष दल आणि गडचिरोली तसंच नक्षलग्रस्त भागातील दलांना हे नवीन जॅकेट देण्यात

येणार आहे.

 

याआधी राज्य पोलिस दलानं 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 मध्ये बुलेटप्रुफ जॅकेट विकत घेतले होते. राज्य सरकारनं त्यावेळी घेतलेले 110 जॅकेट पोलिस अधिकाऱ्यांच्या प्राणाचे रक्षण

करण्यात अपयशी ठरल्याचे 26/11 हल्ल्यात उघड झाले.

 

या हल्ल्यात एटीएस प्रमुख हेंमत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे आणि एन्कांऊटर स्पेशालिस्ट विजय साळसकर शहीद झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version