जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पटसंख्या कमी असलेल्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना जवळच्या खासगी शाळांमध्ये सामावुन घेण्यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलंये.
राज्य सरकारचा हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारा असल्याची टीका आमदार कपिल पाटील यांनी केलीये.
गरीब विद्यार्थांना याचा फटका बसणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगीतलंय. तर, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांवर वेळेचे निर्बंध लादण्यात आलेत ते चुकीचे आहे.
तर, यावर प्रत्योत्तर देत समाजवादी विचार बोलायचे आणि भांडवलदारांच्या मांडीवर जाऊन बसायचे अशी घणाघाती टीका शिक्षणमंत्र्यांनी पाटील यांच्यावर केलीये.
दहावी आणि बारावीच्या परीक्षे आधी विद्यार्थ्यांना अर्धातास आधी परिक्षा केंद्रावर येण्याची मुभा दिली जाते असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलंये.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.