Mumbai News: मुंबईत मोठा घातपाताचा कट उधळला; उंदीर मारण्याच्या गोळ्या व झिंक फॉस्फाईड जप्त, फय्याज होता मास्टरमाईंड?

मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान नागरिकांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने काही वस्तूंचा वापर करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Mumbai News: मुंबईत मोठा घातपाताचा कट उधळला; उंदीर मारण्याच्या गोळ्या व झिंक फॉस्फाईड जप्त, फय्याज होता मास्टरमाईंड?

मुंबईत येथे मोठा कट उघडकीस आल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित रसायन आणि औषधांच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात एका व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान नागरिकांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने काही वस्तूंचा वापर करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आरोपीकडून मोठ्या प्रमाणात गोळ्या आणि रसायनांची ऑर्डर देण्यात आल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 14,900 गोळ्या जप्त करण्यात आल्या असून अंदाजे 30,000 गोळ्यांची ऑर्डर देण्यात आली होती. तसेच 50 किलो झिंक फॉस्फाईड मागवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव फय्याज प्रेमजी असे असून त्याला अटक करण्यात आली आहे. तो Pune येथील विमाननगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे आणि त्याचे वय 39 वर्षे असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Mumbai: ‘इम्युनिटी बूस्टर’ की काही वेगळंच? मोहर्रम मिरवणुकीत वाटल्या कॅप्सूल; अनेकजण रुग्णालयात दाखल 

तपासादरम्यान पोलिसांना अंदाजे 14,900 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. प्रत्येक कॅप्सूलमध्ये सुमारे 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड मिश्रित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच सुमारे 50 किलो झिंक फॉस्फाईड मागवण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लोकांना हानी पोहोचवण्याच्या हेतूने हा साठा तयार केल्याचा संशय आहे. याशिवाय तो यापूर्वी 2025 मध्ये इराण आणि इराक येथे जाऊन आल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version