…अन् त्याच्या छातीत रॉड घुसला; मुंबईतील विचित्र अपघात

…अन् त्याच्या छातीत रॉड घुसला; मुंबईतील विचित्र अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

 

मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला.  इमारतीचं बांधकाम सुरु असताना कामगार तिसऱ्या मजल्यावरुन पडल्यानंतर छातीत रॉड घुसून कामगार गंभीर जखमी झाला आहे.

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत 21 वर्षीय राजेंद्र पाल हा कामगार तिसऱ्या मजल्यावर काम करत होता. त्यावेळी पाय घसरुन तो थेट तळमजल्यावर खाली पडला. खाली पडताना त्याच्या छाती आणि पोटात कॉलमचे रॉड घुसले.

ही घटना घडल्यानंतर राजेंद्र बराच काळ त्याच अवस्थेत राहिला. काही जणांनी त्याची मदत करण्याचे प्रयत्नही केले. अखेर अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने राजेंद्रला गॅसकटरच्या मदतीने बाहेर काढलं.

सध्या राजेंद्रची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version