केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई पालिकेची नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई पालिकेची नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जुहू येथील बंगल्याच्या बांधकामावरून मनपाने नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे.

२०१७मध्ये नारायण राणे यांच्या जुहू येथील आदिष बंगल्याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीमध्ये बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी मुंबई पालिकेने नारायण राणेंना नोटीस पाठवली आहे.

मुंबई पालिकेने बेकायदेशीररित्या बांधकामांना आळा घालण्यासाठी नारायण राणेंच्या जूहू येथील बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी ही नोटीस बाजवली आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८च्या कलम ४८८ अन्वये ही नोटीस पाठवली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version