Mumbai Metro : मेट्रोचं जाळं विस्तारणार! पूर्व-पश्चिमसह उत्तर-दक्षिण मुंबईदेखील जोडली जाणार, आता पाच नवी स्थानकं…

2025मध्ये निश्चित करण्यात आलेल्या मार्गाचा विस्तार होणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली. 
Mumbai Metro :  मेट्रोचं जाळं विस्तारणार!  पूर्व-पश्चिमसह उत्तर-दक्षिण मुंबईदेखील जोडली जाणार, आता पाच नवी स्थानकं…

मुंबईत सध्या मेट्रोचा विस्तार वेगाने होताना दिसत आहे. 2026-2027 च्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित मेट्रो 11च्या मार्गांमधील काही बदल जाहीर केली. 2025मध्ये निश्चित करण्यात आलेल्या मार्गाचा विस्तार होणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली. 

समोर आलेल्या माहितीनुसार, मेट्रो मार्गिका 11 ही पूर्णत:  भुयारी मार्गिका असणार आहे. त्याचप्रमाणे ती मेट्रो लाइन 4 ला वडाळा ते कासरवडवली मेट्रोला जोडली जाणार आहे. या मार्गिकेसाठी एकूण 23,487 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.यामुळे मुंबईतील पूर्व-पश्चिमसह उत्तर-दक्षिण परिसरांनाही जोडणी मिळणार आहे. शहरातील प्रवास अगदी सुलभ होणार आहे.

हेही वाचा – T20 World Cup Final Recharge Plans: आता घरबसल्या लुटा फायनल मॅचचा आनंद, एअरटेल, जिओ आणि व्हीआयने लॉन्च केला आतापर्यंतचा स्वस्त प्लॅन 

 या मार्गिकेवर चुनाभट्टी, शीव, मध्य धारावी, वांद्रे पश्चिम आणि वांद्रे टर्मिनस अशा स्थानकांचा समावेश करणात आला आहे. धारावी मेट्रो स्थानकावरून ही मार्गिका मेट्रो 3 लासुद्धा जोडणार आहे. त्यामुळे कुलाबा, वांद्रे कुर्ला संकुल आणि सीप्जला जाणं सोपं होणार आहे. वांद्रे पश्चिम स्थानकावरून मेट्रो लाइन 2बी ला जोडण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version