मरोळ परिसरात इमारतीला आग;एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

मरोळ परिसरात इमारतीला आग;एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतील मरोळ भागातील एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीमध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

हे सगळेजण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात आले आहे. मरोळ भागातील चर्चरोड शिवाजीनगर भागात असलेल्या बाहेरी कॉलनीतील मैमून मॅन्शन इमारत आहे.

या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रहात असलेल्या कापसी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर कापसी कुटुंबाच्या वरच्या बाजूला राहणाऱ्या कोठारी कुटुंबातील 7 जण जखमी झाली आहेत. या दुर्घटनेमुळे या परिसरातील सगळे जण हादरले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version