भाउचा धक्‍का ते मांडवा रो रो सेवा मे महिन्‍यात सुरू होणार….

भाउचा धक्‍का ते मांडवा रो रो सेवा मे महिन्‍यात सुरू होणार….
जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्‍या मुंबईतील भाउचा धक्‍का ते मांडवा या रो रो सेवेसाठी मांडवा येथील टर्मिनल आणि जेटीचे काम अंतिम टटप्‍यात आहे. पुढील महिन्‍यात हे काम पूर्ण होवून ही बारमाही प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार आहे .
एकेकाळी कोकणात प्रवासी वाहतूकीसाठी  जलमार्ग हा एकमेव पर्याय होता . मुंबईतील भाउचा धक्‍का ते अगदी गोव्‍यापर्यंत या बोटी जात होत्‍या. पुढे गावागावात रस्‍त्‍याचे जाळे विणलं गेलं . एसटी प्रवासी वाहूतक सुरू झाली आणि 1972 च्‍या सुमारास प्रवासी जलवाहतूक बंद पडली. आता केंद्र सरकारच्‍या सागरमाला प्रकल्‍पाअंतर्गत पहिल्‍या टप्‍प्‍यात भाउचा धक्‍का ते मांडवा अशी प्रवासी रो रो सेवा सुरू करण्‍यात येणार आहे . त्यासाठी मांडवा बंदरात नवीन सोयींनी युक्‍त असे टर्मिनल उभारण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात आहे. प्रकल्‍पाचे 95 टकके काम झाले असून हे काम मे महिन्‍यात पूर्ण होवून बारमाही सेवा सुरू होईल , असा दावा महाराष्‍ट्र मेरीटाईम बोर्डाकडून केला जातोय.
 
135 कोटी रूपये खर्चून हा प्रकल्‍प आकारात येत आहे . सध्‍या मुंबई ते मांडवा या फेरीबोटसेवेचा हजारो प्रवासी लाभ घेतात.  रो रो सेवेमुळे  बारमाही प्रवासी आणि वाहनांची वाहतूक शक्‍य होईल . त्‍यातून प्रवास तर सुखकर होईलच परंतु इथल्‍या पर्यटनालाही चांलना मिळणार आहे. असे असले तरी काही ठिकाणी बोटी उभ्‍या राहणार आहेत त्‍या ठिकाणी मोठया प्रमाणावर गाळ साचतो त्‍यामुळे बारमाही वाहतूकीबाबत प्रवाशांकडून शंका व्‍यक्त होत आहे . परंतु संपूर्ण अभ्‍यास करूनच प्रकल्‍पाची उभारणी करण्‍यात आले असल्याचा दावा मेरीटाईम बोर्डाकडून सांगण्‍यात आला आहे.
 
हा प्रकल्‍प एप्रिल महिन्यात सुरू होणे अपेक्षित होता मात्र काही तांत्रिक कारणांमुळे एक महिनाभर उशीराने सुरू होणार असला तरी या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे  कोकणात जलवाहतूकीचे पर्व पुन्‍हा नव्‍याने सुरू होईल शिवाय पर्यटन वाढीला चालना मिळेल यात शंकाच नाही.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version