Mumbai Local Train Case Update: मुंबई लोकल मारहाण प्रकरणात मोठी अपडेट; आरोपीला गोवंडीतून अटक, पण प्रकरणात आला नवा ट्विस्ट

सध्या त्याची चौकशी सुरू असून, या प्रकरणातील सर्व पैलूंची तपासणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
Mumbai Local Train Case Update: मुंबई लोकल मारहाण प्रकरणात मोठी अपडेट; आरोपीला गोवंडीतून अटक, पण प्रकरणात आला  नवा ट्विस्ट

मुंबईची लोकल ही लाखो प्रवाशांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून लोकलमधील भांडणे, मारामाऱ्या आणि प्रवाशांमधील वादाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, आता या प्रकरणात महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गोवंडी परिसरातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अन्सारी असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असून, या प्रकरणातील सर्व पैलूंची तपासणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. चौकशीदरम्यान आरोपीने मारहाण झालेली व्यक्ती महिला नसून तृतीयपंथी असल्याचा दावा केला आहे. मात्र, हा दावा अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेला नसून, पोलिसांकडून त्याची पडताळणी सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित पीडित व्यक्तीचाही शोध सुरू केला आहे. व्हायरल व्हिडीओ, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मारहाण झालेली व्यक्ती महिला होती की तृतीयपंथी, याबाबतही पोलीस खातरजमा करत आहेत. यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना लोकल ट्रेनच्या पुरुषांच्या डब्यात घडली होती. संबंधित व्यक्ती सीटवर झोपल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि आरोपीने संबंधित व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर शिवीगाळ करत कमरेचा पट्टा काढून धमकावल्याचाही प्रकार व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आला होता.

या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, डब्यात मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित असूनही कोणीही मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले नाही. काही प्रवासी संपूर्ण प्रकार पाहत राहिले, तर काहींनी या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version