Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेवर 300 लोकल्सची ‘पॉवर कट’! नाताळच्या सुट्टीत प्रवाशांची कसोटी; सविस्तर माहिती इथे

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, या ब्लॉक कालावधीत विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी पर्यायी वाहतूक साधनांचा, जसे की बेस्ट बस किंवा मेट्रोचा वापर करावा.
Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेवर 300 लोकल्सची ‘पॉवर कट’! नाताळच्या सुट्टीत प्रवाशांची कसोटी; सविस्तर माहिती इथे

मुंबई: डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुट्ट्यांचा आनंद घेण्याच्या तयारीत असलेल्या मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवासाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही 26 आणि 27 डिसेंबर रोजी घराबाहेर पडणार असाल, तर रेल्वेचे वेळापत्रक तपासूनच बाहेर पडा, अन्यथा तुमचा आनंदाचा बेत बिघडू शकतो. पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू असल्याने शुक्रवारी, 27 डिसेंबर रोजी तब्बल 300 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली स्टेशनवर ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ पॅनल कार्यान्वित करण्यासाठी 26 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजल्यापासून 27 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत एक मोठा ‘नॉन-इंटर लॉकिंग’ ब्लॉक घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे केवळ 27 डिसेंबरलाच नव्हे, तर 26 डिसेंबरच्या रात्रीपासूनच रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. या कालावधीत अप आणि डाऊन दोन्ही धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार असून, प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: India America Trade Deal: दोस्ती अपनी जगह, टॅरिफ अपनी जगह! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर भारताचा मास्टरस्ट्रोक

केवळ फेऱ्या रद्द होणे इतकेच नाही, तर अनेक लोकलच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत. बोरिवली आणि अंधेरीपर्यंत धावणाऱ्या साधारण 14 लोकल फेऱ्या केवळ गोरेगाव स्टेशनपर्यंतच धावतील. तसेच कांदिवली ते दहिसर दरम्यान डाऊन जलद मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात आली असल्याने गाड्या नेहमीपेक्षा उशिराने धावतील. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी किंवा नाताळच्या सुट्ट्यांसाठी मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आणि बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना या ब्लॉकचा मोठा फटका बसणार आहे.

दुसरीकडे, मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. पनवेल स्थानकावर रेल्वे स्थानक पुनर्विकास आणि कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी 30 डिसेंबरपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे पनवेल मार्गे कोकणात किंवा पुण्याला जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, काही गाड्या रद्द किंवा नियमित मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांनी देखील आपली प्रवासाची आखणी करताना रेल्वेच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, या ब्लॉक कालावधीत विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी पर्यायी वाहतूक साधनांचा, जसे की बेस्ट बस किंवा मेट्रोचा वापर करावा. रेल्वेचे हे काम प्रवाशांच्या भविष्यातील सोयीसाठी आणि गाड्यांची क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असले, तरी सध्याच्या सुट्ट्यांच्या काळात यामुळे मुंबईकरांच्या संयमाची परीक्षा पाहणारे ठरणार आहे.

हेही वाचा: Maharashtra Government: प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारचा गेमचेंजर निर्णय! स्वतंत्र महामंडळ येणार; पुनर्वसन ते रोजगार मिळणार एका छताखाली

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version