रेल्वेच्या वेळापत्रक बदलामुळे प्रवाशांना फायदा कमी आणि मनस्तापच जास्त सहन करावा लागतोय

रेल्वेच्या वेळापत्रक बदलामुळे प्रवाशांना फायदा कमी आणि मनस्तापच जास्त सहन करावा लागतोय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

हवामानातील बदलामुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात धूके जमा होत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने धावत होत्या. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने कसारा आणि कर्जत मार्गावरील काही फे-यांच्या वेळेत बदल केला.

या बदलामुळे प्रवाशांचा फायदा कमी आणि मनस्तापच जास्त सहन करावा लागला.  यामुळे प्रवासी संघटनांच्या शिष्टमंडळांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची सोमवारी भेट घेतली.

प्रवासी संघटनांचा आक्रमकपणा पाहून, मंगळवारी सायंकाळी हिवाळी वेळापत्रक रद्द करण्याची घोषणा केलीय. 21 डिसेंबरपासून पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे लोकल फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version