भारतीय रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सीवूड्स-दारावे या स्थानकाचे नाव बदलून 'सीवूड्स-दारावे-करावे' असे करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार या स्थानकाचे नाव सीवूड्स-दारावे वरून 'सीवुड्स-दारावे-करावे' असे बदलण्यात येत असून नव्या स्थानकाचा कोड SWDK असा असेल.
त्यानुसार, महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेनुसार आणि भारताच्या सर्व्हेअर जनरलच्या पत्रानुसार, स्थानकाचे नवीन नाव खालीलप्रमाणे वाचले आणि लिहिले जाईल. देवनागरी लिपी (मराठी): सीवूड्स-दारावे-करावे
देवनागरी लिपी (हिंदी): सीवूड्स-दारावे-करावे, रोमन लिपी (इंग्रजी):SEAWOODS–DARAVE–KARAVE असे करण्यात येणार आहे.
या बदलांमध्ये स्थानकाच्या सर्व नोंदी, दिशादर्शक फलक (signages), रेल्वे घोषणा प्रणाली (announcement system) तसेच प्रवासी माहिती प्रणाली (Passenger Information System) यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी नवीन नावाचा समावेश करून ते अद्ययावत केले जाणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने लोकल आणि एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना व सामान्य नागरिकांना विनंती केली आहे की त्यांनी या नामकरणाच्या बदलाची नोंद घ्यावी आणि त्यानुसार नवीन नावाचा वापर करावा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.