उन्हाळ्यात सर्वसामान्यांना भीती असते ती वीजबीलाची. एसी, फॅनचा अधिक वापर यामुळे वीजबील अधिक येते. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसते. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या 1 एप्रिलपासून वीज दरात कपात होणार आहे.अदानी तसेच महावितरण, बेस्ट, टाटा या सर्व महत्त्वाच्या वीज वितरण कंपन्या असून यांनी केलेल्या विनंतीवरुन राज्य वीज नियामक आयोगाने वीज दरात कपात केली आहे.
वीजबील किती कमी येणार?
मुंबईकरांना बेस्टकडून सर्वात कमी दरात वीज पुरवठा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 2025 आणि 26 या वर्षात 0 ते 100 युनिटसाठी 4. 76 रुपये दर होता तर आता 2026-27 या वर्षात हाच दर कमी होऊन तो 4.3 रुपये झालेला आहे. म्हणजेच सुमारे 9.7 टक्के कपात झालेली आहे. 101 ते 300 या युनिटसाठी सुरुवातीस 7.97 रुपये ग्राहकांना द्यावे लागते होते तर आता नवीन दर हे 7.1 रुपये असणार आहे. ज्यामध्ये साधारण 10.8 टक्के घट झालेली आहे. त्याचप्रमाणे 301 ते 500 युनिटसाठी आधी 13.55 रुपये आकारले जात होते. आता तोच दर कमी होऊन जवळपास 11.64 रुपये झाला आहे. म्हणजेच तब्बल 14 टक्के कपात झालेली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.