जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
त्रिपुरामध्ये लेनिन यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर त्याचे पडसाद मुंबईतही पडलेले पाहायला मिळाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून दादर येथे पुतळ्याच्या विटंबना निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आक्रमक होत पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांनी अभ्यास करावा असं म्हटलंय. तसेच, हे निषेध मोर्चे संपूर्ण देशभरात पाहायला मिळतील असा इशारा कम्युनिस्ट पक्षांच्या नेत्यांनी दिलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.