कमला मिल अग्नितांडवानंतर मोजोस ब्रिस्ट्रोमधील अग्नि खेळीचा व्हिडिओ व्हायरल

कमला मिल अग्नितांडवानंतर मोजोस ब्रिस्ट्रोमधील अग्नि खेळीचा व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांच्या मृत्यू झाल्यानंतर ही आग कशामुळे लागली याबद्दल चौकशी सुरु करण्यात आली आहे. या घटनेनंतर मोजोस ब्रिस्ट्रो हॉटेलमधील आगीच्या खेळीचा एक जुना व्हिडीओ व्हायर झालाय. विशेष म्हणजे हा व्हिडीओ जिथे आग पसरली त्या कमला मिलमधील मोजो ब्रिस्टोमधीलच आहे.

हा खेळ सुरु असतांना बारमध्ये  प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अशी काही दुर्घटना झाल्यास मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमला मिलमधील आगीनंतर महापालिकेचे अधिकारी अशा बार आणि रेस्टॉरेंट कारवाई करतात का? हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version