झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने ‘तो’ मार्ग स्वीकारला

झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने ‘तो’ मार्ग स्वीकारला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मिता मलानी आणि राकेश इसरानी अशी या दोघांची नावे आहेत. यापैकी राकेश हा त्याच्या घरी खोट्या नोटा तयार करत होता, तर मिता या नोटा कमिशनवर विकत घेऊन चलनात आणत होती. या नोटा कशाप्रकारे तयार केल्या जात होत्या, याचे प्रात्यक्षिकही पोलिसांसमोर आरोपीने दाखवलं.

हलक्या कागदावर दोन्ही बाजूंनी 100 रुपयांच्या नोटेची कलर प्रिंट काढून नंतर त्या चिकटवण्यात येत होत्या, तसेच, त्या खऱ्या वाटण्यासाठी त्यावर आरबीआयचं स्टिकरही चिकटवण्यात येत होतं. त्याचं सफाईदार काम बघून पोलीस आणि पत्रकारही थक्क झाले. या सगळ्याबाबत कुणकुण लागल्यानंतर क्राईम ब्रँचने या दोघांना अटक केली. यावेळी राकेशच्या घरातून जवळपास 45 हजार रुपयांच्या 100 रुपयांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या.

राकेश हा रिक्षाचालक असून झटपट श्रीमंत होण्यासाठी आपण खोट्या नोटा छापल्या, तसेच, पकडल्या जाऊ नये म्हणून 100 रुपयांच्या नोटा छापल्याची कबुली त्याने दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version