Ganeshotsav 2026 : POP गणेशमूर्तींबाबत हायकोर्टाचा मोठा दिलासा; आता 6 फुटांवरील गणेशमूर्तींना नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जनाला परवानगी

Ganeshotsav 2026 : POP गणेशमूर्तींबाबत हायकोर्टाचा मोठा दिलासा; आता 6 फुटांवरील गणेशमूर्तींना नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जनाला परवानगी

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पेरिसच्या (PoP) गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या तात्पुरत्या निर्णयानुसार यावर्षीही 6 फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या पीओपी मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलप्रवाहात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातील सहा फुटांवरील गणेशमूर्तींबाबतची अनिश्चितता संपुष्टात आल्याचे चित्र आहे. परिणामी, गणेशभक्त तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : Shiv Sena Hearing : ठाकरे गटाची मोठी खेळी! विधानसभेचा कार्यकाळ संपल्यावही शिंदे गट अपात्र? कपिल सिब्बल कोर्टात काय म्हणाले? वाचा सविस्तर

उच्च न्यायालयाने 24 जुलै 2025 रोजी दिलेला आपला अंतरिम आदेश तूर्तास कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे विसर्जनाच्या नियमांबाबत स्पष्टता आली आहे. ज्या पीओपी गणेशमूर्तींची उंची 6 फुटांपेक्षा जास्त असेल, त्यांचे विसर्जन नदी, समुद्र किंवा तलाव अशा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version