जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बाजारात भाजी विकत घेतांना आपण ती कुठून आली आहे. याचा विचारच करत नाही. भाजीवाले ती भाजी कुठए ठेवतात, स्वच्छता बळगतात की नाही हे आपल्या लक्षातच येत नाही. अशाच प्रकारचा भाजीवल्यांचा एक व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामध्ये भाजीवाले रस्त्यावर असलेल्या ड्रेनेजमधून लपवलेला माल काढतायत.
मुंबई महापालिकेचे अतिक्रमण पथक आल्यावर ड्रेनेजमधे भाजी लपवण्याच्या प्रकाराचा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. परप्रांतीय फेरीवाले महापालिकेच्या पथकापासून माल वाचवण्यासाठी पथक आल्यावर हा माल ड्रेनेजमधे लपवतात आणि पथक परत गेल्यावर तीच भाजी पुन्हा ग्राहकांला विकतात.
वाकोला परिसरातील हा प्रकार उघड झालाय. जय महाराष्ट्र न्यूज टीमने इथला ग्राऊंड रिपोर्ट घेऊन इथली भाजी, फळ विकत घेऊ नका अस आव्हान करत. हे फेरीवाले तुमच्या जीवाशी खेळत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.