मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात, रेल्वे हमालांचे आंदोलन

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात, रेल्वे हमालांचे आंदोलन
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
 
 
अनेक चित्रपटांमधून ग्लॅमर प्राप्त झालेल्या रेल्वे हमालांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. अखिल भारतीय मजदूर संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आज देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. देशभरातील हमाल संघटनांनी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे.
 
हमालांच्या या आंदोलनाला मुंबईतील रेल्वे हमालांनीही पाठिंबा दिला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील रेल्वे हमालांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात निदर्शने केली आहेत. 
यांत्रिकीकरणामुळे हमालीची काम मिळत नसल्याने हमालांनी हे आंदोलन पुकारले आहे. लालू प्रसाद यादवांच्या कार्यकाळात हमालांना डी ग्रेड मार्गात समाविष्ट केले होते. मात्र आता त्यातून काढण्यात आल्याने पुन्हा एकदा डी ग्रेडमध्ये वर्ग करण्याची मागणी हमालांनी केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version