बाप्पा येण्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाला खड्ड्यातून बाहेर काढण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन

बाप्पा येण्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाला खड्ड्यातून बाहेर काढण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई गोवा महामार्ग यंदाच्या पावसाळ्यात अधिकच खड्डेमय झाला. खड्ड्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

 

त्यामुळे गेल्यावर्षी खड्डे बुजवण्यासाठी खर्च झालेला लाखोंचा निधी खड्ड्यातच गेला असच म्हणावं लागत आहे. तर, गणेशोत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपला असून या

पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 5 ऑगस्टपूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन दिले.

 

गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बुजवल्यास आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीनं दिला आहे. त्यामुळे यंदातरी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास खड्डेमुक्त

होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version