मुंबई-गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे पुन्हा चाळण

मुंबई-गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे पुन्हा चाळण

गेली १४ वर्ष बांधकाम रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर या वर्षी देखील पुन्हा खड्डे पडले आहेत. पावसाळ्या पूर्वी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते.

खड्डे मुक्त महामार्गावरून यावर्षी प्रवास करता येईल असा विश्वास देण्यात आला होता. पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाची परीस्थिती पाहिलीतर हा दिलेला विश्वास फोल ठरला आहे. पेण ते पोलादपुर दरम्यान पेण, रामवाडी, वडखळ, पळस, वाकण, सुकेळी, कोलाड, खरवली, तळेगाव, लोणेरे, नांगलवाडी, चोळई आदी ठिकाणी हे खड्डे पडले आहे. या खड्डयांतुन मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत होत आहे तर गाड्या खड्डयांमध्ये आपटल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version