मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्ताच्या मोबदला वाटपात मोठा घोळ झाल्याची धक्कादायक माहिती उघड

मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्ताच्या मोबदला वाटपात मोठा घोळ झाल्याची धक्कादायक माहिती उघड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पग्रस्ताच्या मोबदला वाटपात मोठा घोळ झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय.

किशोर आगणे कुटुंबियांची कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथे सामायिक जमीन आणि घर आहे. यात चार हिस्सेदार आहेत. त्यामुळे साहजिकच या जमिनीच्या मोबदल्याची रक्कम चारही हिस्सेदारांना समान मिळणे अपेक्षित होते. मात्र यातील तीन हिस्सेदाऱ्यांच्या खात्यात मोबदल्यापोटीची  30 लाख 6 हजार 86  रुपये  एवढी रक्कम जमा झाली. तर चौथ्या हिस्सेदाराला तब्बल 1 कोटी.27लाख 17हजार 840 रुपये.एवढी रक्कम अदा करण्यात आलीय.

विशेष म्हणजे या प्रकल्प ग्रस्तांचनी हा घोळ प्रशासनाच्या लक्षात आणण्यासाठी पाठपुरावा देखील केला. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केलय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version