मुंबई-गोवा क्रूझसेवा एप्रिलपासून सुरु

मुंबई-गोवा क्रूझसेवा एप्रिलपासून सुरु

वृत्तसंस्था,मुंबई

उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना आता समुद्राची गाज ऐकत प्रवासाचा आनंद घेता येईल. एप्रिल महिन्यापासून मुंबई ते गोवा या मार्गावर क्रूझसेवा सुरू होत आहे. वास्तविक पाहता जानेवारी 2018 पासूनच ही सेवा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे सेवेला मुहूर्त मिळाला नव्हता.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानगीने खाजगी कंपनी ही क्रूझसेवा सुरू करणार आहे. 150 ते 200 प्रवासी क्षमता असणाऱ्या या क्रुझचे भाडे सुमारे एक ते दीड हजार रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र, नेमके भाडे किती असावे याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. एप्रिल महिन्यापासून ही सेवा सुरू होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version