उद्या अनंत चतुर्दशी…गेल्या 10 दिवसांपासून मुक्कामी असलेले लाडके बाप्पा आता आपल्या गावाला निघणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वचजण सज्ज झाले आहे.
खास करून मुंबई,पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये बाप्पाच्या विसर्जनासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. उद्या हा लाडका बाप्पा वाजतगाजत सर्वांचा निरोप घेणार आहे. या निरोप प्रसंगी कोणतेही विघ्न घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
मुंबईतील विविध चौपाट्यांवर उसळणारी गर्दी पाहता घातपात घडू नये किंवा कायदा व सुव्यस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मुंबई पोलिसांचे पन्नास हजार अधिकारी आणि कर्मचारी रविवारी बंदोबस्ताला तैनात असतील. लालबागचा राजा आणि अशाच मोठ-मोठ्या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन पाहायचे असेल तर तुम्ही गिरगाव चौपाटी गाठू शकता.
अशी आहे मुंबईत व्यवस्था
मुंबई : गणेश विसर्जन ठिकाण
विसर्जनासाठी मुंबई सज्ज
विसर्जनासाठी ट्राफिकच्या उपाययोजना
मध्य मुंबई मार्ग
लोअर परेल ब्रिज बंद झाल्यामुळे मध्य मुंबई सर्वात वाईट प्रभावित होईल, कारण अनेक मंडळाला एलफिस्टन आणि महालक्ष्मी मार्गाचा पर्याय घ्यावा लागला आहे.
डेलिसली पुल तोडल्यामुळे परेल, लालबाग, शिवरी, चिंचपोकळी आणि लोअर परेल परिसरातील 40 प्रमुख मंडळाला अतिरिक्त तीन किलोमीटर प्रवास करावा लागेल, आधीच गर्दी असलेल्या महालक्ष्मी आणि सात रस्ता परिसरात जर प्रवाश्यांनी एलफिन्स्टन पुलाचा मार्ग घेतला तर एकेरी वाहतूकीला अधिक त्रास होईल.
पश्चिम मुंबई मार्ग
मेट्रोच्या कामकाजामुळे आणि गणपती विसर्जनामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावर ट्रफिक लागणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.