मुंबईचा डब्बेवाला आज ‘बंद’ !

मुंबईचा डब्बेवाला आज ‘बंद’ !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सर्व मुंबईकरांची भूक भागवणारा मुंबईचा डब्बेवालाही या पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. या मुसळधारांनी त्याचेही हाल झाले आहेत.

 

मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या डबेवाल्यांची डबे पोचवण्याची सेवा विस्कळीत झाली आहे. काल दिवसभर आणि संपुर्ण रात्रभर डबेवाले विविध स्टेशनवर लोकल ट्रेनमध्ये अडकुन पडले होते.

 

सोबत जेवणाचे डबे असल्यामुळे त्यांनी संपुर्ण रात्र लोकलच्या लगेज कंपार्टमेंट मध्ये बसुन काढली. रिकामी डबेच अजून घरी पोहचू शकलेले नाही, त्यामुळे आज मुंबईत डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आली असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version