Mumbai Crime : धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार! क्षुल्लक कारणावरून प्रवाशाची चाकूने हत्या

काल रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मुंबई लोकलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान काल रात्री 10 वाजताच्या सुमारास हा भयानक प्रकार घडला.
Mumbai Crime : धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार! क्षुल्लक कारणावरून प्रवाशाची चाकूने हत्या

काल रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मुंबई लोकलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान काल रात्री 10 वाजताच्या सुमारास हा भयानक प्रकार घडला. मयंक लोहार यांची एका क्षुल्लक कारणावरून चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. काल रात्री सुरु असलेल्या मुसळधार पावसादरम्यान लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून मयंक लोहार यांचा आरोपीसोबत वाद झाला.

हेही वाचा- Ketan Agarwal Lohagad Case : हुडी घातलेल्या पोरामुळे बिंग फुटलं! तोच होता सियाचा बॉयफ्रेंड; पोलिसांनी सांगितलं केतनला कसं ढकललं 400 फूट दरीत

काल रात्री जोरदार पाऊस पडत होता, लोकलचे दार उघडे असल्यामुळे पावसाच्या सरी थेट आत बसलेल्या प्रवाशांवर देखील पडत होत्या. त्यामुळे त्या डब्यात बसलेल्यांनी दरवाजा बंद करण्यास सांगितला म्हणून दोन प्रवाशांमध्ये जोरदर वाद झाला. या वादाचे रुपांतर गंभीर हत्येत झाले. या वादादरम्यान संतप्त आरोपीने बॅगेतून चाकू काढून मयंक लोहार यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मयंक लोहार यांचा मृत्यू झाला असून वादानंतर आरोपीला काही प्रवाशांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आरोपीची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांची 6 पथके तैनात आहेत. तर पश्चिम रेल्वे पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version