कॉनव्हेंट शाळेत अनधिकृत बांधकाम; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

कॉनव्हेंट शाळेत अनधिकृत बांधकाम; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

चैनईतील कुंबाकोण शहरात 16 जुलै 2004 साली एका शाळेला आग लागली होती आणि या मध्ये 94 विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला होता. शाळेत आग लागली याचे कारण होते शाळेत गॅस सिलेंडर आणि स्वयंपाक घर केले होते तसेच अनधिकृत बांधकाम असल्याने निष्पाप मुलांना जीव गमावावा लागला. ही माहीती देण्याचे कारण असे कि मुंबईतील एक शाळा अशीच धोकादायक बनलीय.

एका पालकाच्या निदर्शनास हा प्रकार आलाय आणि या पालकाने प्रभादेवी मधील कॉनव्हेंट गर्ल हायस्कूलच्या विरोधात लढा देण्याचे ठरवलय. त्यांनी ही गोष्ट पालिकेच्या आणि अग्निशमन दलाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र गेले सहा महिने शाळा व्यवस्थापन त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतायेत. शिक्षण विभागाने या शाळेवर कारवाई करा असे आदेश या दोन्ही विभागांना दिलेत मात्र आज करू उद्या करू अशी चाल ढकल केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version