आता आईस्क्रिम खाताना सावधान!

आता आईस्क्रिम खाताना सावधान!

आईस्क्रिममध्ये मेलेलं झुरळ आढळल्याचा किळसवाणा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे, हे आईस्क्रिम खाऊन एक 8 वर्षांची मुलगी आजारी पडली आहे.

अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरात रविवारी ही घटना घडली.

याच परिसरात राहणारी एक 8 वर्षांची मुलगी जवळच्या सोमेश्वर डेअरीतून चोकोबार आईस्क्रिम घेऊन आली.

मात्र या आईस्क्रिमच्या वरचा चॉकलेटचा थर खाताच आतल्या व्हॅनिला आईस्क्रिममध्ये चक्क मेलेलं झुरळ आढळून आलं.

आईस्क्रिम खाताना हा किळसवाणा प्रकार लक्षात आल्याने या मुलीची प्रकृती बिघडली.

या प्रकाराबाबत डेअरी चालकाला विचारले असता त्याने जबाबदारी घेण्यास नकार दिला असून हे आईस्क्रिम आपण बाहेरून मागवत असल्याचं सांगितलं आहे.

याबाबत मुलीच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून डेअरी चालकाविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मात्र 2 दिवस उलटूनही अद्याप या डेअरीवर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version