१९९३ मुंबई बॉम्बस्फोट खटला; ७ सप्टेंबरला होणार सुनावणी

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट खटला; ७ सप्टेंबरला होणार सुनावणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अबू सालेमसह अन्य सहा जणांना मुंबईतील विशेष टाडा न्यायालय 7 सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावणार आहे.

या खटल्यात एकूण सात आरोपींची नावं समोर आली होती. यातील एक आरोपी मुस्तफा डोसाचा जूनमध्ये तुरुंगात मृत्यू झाला होता.

 

मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या दुसऱ्या टप्प्यात विशेष ‘टाडा’ न्यायालयाने जून महिन्यात सहा जणांना दोषी ठरवले होते.

मुस्तफा डोसा, अबू सालेम, फिरोज अब्दुल रशिद खान, करिमुल्ला खान ऊर्फ हुसेन हबीब शेख, ताहिर मोहम्मद मर्चंट ऊर्फ ताहिर टकल्या, रियाझ सिद्दिकी या सहा जणांना न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले होते. तर अब्दुल कय्यूम करिम शेख या आरोपीची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती.

 

जूनमध्ये न्यायालयाने या सातही आरोपींना दोषी ठरवले असले तरी या सर्वांना शिक्षा सुनावण्यात आली नव्हती. पोर्तुगाल सरकारने अबू सालेमचे प्रत्यार्पण करताना त्याला

फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, अशी अट घातली होती. न्यायालय अबू सालेमला काय शिक्षा सुनावणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version