साठ्याअभावी बीकेसीमधील लसीकरण ठप्प

साठ्याअभावी बीकेसीमधील लसीकरण ठप्प

मुंबई: वांद्रे-कुर्ला संकुल केंद्रातील लशीचा साठा संपल्यामुळे लसीकरण ठप्प झाले आहे. पालिकेला १.२५ लाख लशींच्या मात्रा मिळाल्या असून सर्व केंद्र कार्यान्वित होत आहेत, असे पालिकेने नुकतेच जाहीर केले होते. यानंतर दोनच दिवसांत बीकेसी लसीकरण केंद्रातील साठा संपला आहे.

‘आम्हाला दोन दिवसांपूर्वी १२ हजार मात्रा मिळाल्या होत्या. दिवसाला जवळपास साडे पाच ते सहा हजार जणांचे लसीकरण केंद्रावर केले जाते. त्यामुळे हा साठा दोनच दिवसांत संपला आहे. त्यामुळे पुढील साठा मिळेपर्यत लसीकरण स्थगित करावे लागले आहे’, असे बीकेसी केंद्रातर्फे सांगण्यात आले.

संपादन: सिद्धी भरत पाटील

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version