लोकलनंतर मुंबईमध्ये बेस्ट बसला अधिक पसंती दिली जाते. बेस्टने अलिकडच्या काळान अनेक नव्या बस आणल्या आहेत. या बस अत्याधुनिक आहेतच पण त्याचसोबत त्या इलेक्ट्रिकही आहेत. मात्र यामुळे प्रवाशांच्या सरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे असं म्हणावं लागत आहे.
कुर्ला बस डेपोमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कुर्ला बसडेपोमध्ये उभी असलेली बेस्टची नवीकोरी डबलडेकर बस ही जळून खाक झाली आहे. या आगीत संबंधित बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये एकही प्रवासी नव्हता आणि बस आगारात देखभालीसाठी उभी होती, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नवी इलेक्ट्रिक डबल डेकर बस कुर्ला डेपोत उभी होती. यावेळी तिची सर्व्हिसिंग सुरु होती. स्विच मोबिलिटी या कंपनीचे कर्मचारी बसची नियमित तपासणी आणि दुरुस्ती करत होते. हे काम सुरु असताना अचानक या बसमधून धूर सुरु झाला. पुढच्या काही वेळात आगीने रौद्र रुप धारण केले.
आगारात देखभालीसाठी उभ्या असलेल्या बसला अशा प्रकारे आग लागल्याने या बसेसच्या सुरक्षिततेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे. जर ही घटना बस प्रवाशांनी भरलेली असताना रस्त्यावर घडली असती, तर मोठी किती महागात पडलं असतं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.