…म्हणून AC लोकलच्या 12 फेऱ्यांऐवजी केवळ चारच फेऱ्या चालविल्या जाणार

…म्हणून AC लोकलच्या 12 फेऱ्यांऐवजी केवळ चारच फेऱ्या चालविल्या जाणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पश्चिम रेल्वेवर नव्या वर्षात धावणाऱ्या पहिल्यावहिल्या वातानुकूलित लोकल सेवेच्या दररोजच्या प्रस्तावित 12 फेऱ्यांऐवजी केवळ चारच फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.

वातानुकूलित लोकल चालविण्याच्या घोषणेस अडीच वर्षे उलटून गेली असताना, सुरुवातीच्या कालावधीत फक्त चारच फेऱ्या चालविण्याच्या निर्णयाने रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. 

भविष्यात कोणतीही तांत्रिक अडचणी येऊ नये, अशी यामागची रेल्वेची भूमिका असल्याचे सांगण्यात येते. मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये असणाऱ्या वातानुकूलित लोकलची पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता नुकतीच पाहणी केलीय.

यावेळी त्यांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल आणि रिसर्च, स्टँडर्डस अँड​ डिझाइन्स ऑर्गनायझेशन्सच्या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांशी चर्चाही केलीय. वातानुकूलित लोकलमध्ये अजूनही तांत्रिक गोष्टी अपूर्ण असल्याने महाव्यवस्थापकांनी नाराजी दर्शविलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version