मुलुंडमधील मॅनहोलचे झाकण चोरणारे चोरटे गजाआड

मुलुंडमधील मॅनहोलचे झाकण चोरणारे चोरटे गजाआड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   

 

गेल्या काही दिवसात मुंबई उपनगरात आणि मुख्यतः मुलुंड विभागात मोठ्या प्रमाणात मॅनहोलवरील लोखंडी झाकण चोरीला जात होती.

मुलुंडमध्ये अशाच एका झाकण चोरीला गेलेल्या मॅनहोलमध्ये पडून निलीमा पुराणिक जखमी झाल्यात.

या प्रकरणातील मुलुंड पोलिसांनी मॅनहोलवरील झाकणे चोरणारे दोन अट्टल चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हयात उल्ला खान, आणि शफि उल्ला खान अशी या चोरांची नावे आहेत… ही झाकणे खरेदी करणारा इलियाज भंगारवाला सध्या फरार आहे. मुलुंड पोलिसांना गुन्ह्याचा तपास करीत असताना काही सीसीटीव्ही हाती लागले होते. या सीसीटीव्हीमध्ये एक इको टॅक्सी या चोरीत वापरली जात असल्याचे निष्पन्न झाले होते.

अशीच एका इको टेक्सी घेऊन दोन संशयित २५ तारखेला रात्री मुलूंडच्या पी के रोड परीसरात त्यांना आढळले. या पथकाने या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनीच हि झाकणे चोरल्याची कबुली दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version