जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
बोफोर्स घोटाळ्याच्या उल्लेख असलेल्या नववीच्या इतिहासाच्या पुस्तकावरून सध्या वाद सुरू असताना आता सातवीचे इतिहासाचे नवे पुस्तकही वादात सापडले आहे.
सातवीच्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या पुस्तकांतून मुघलच गायब केल्याचा आरोप होत आहे. रुपयाची निर्मिती, समाजजीवन, सांस्कृतिक बदल अशा मुघल
कालखंडातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा उल्लेखच करण्यात आला नसल्याच्या आरोपानं वाद निर्माण झाला आहे.
राज्यात लागू करण्यात आलेली सातवी आणि नववीची पुस्तकं त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.