पाटण आंबेघर दुर्घटनेतील आतापर्यंत ९ मृतदेह सापडले ६ मृतदेहांचा शोध सुरु

पाटण आंबेघर दुर्घटनेतील आतापर्यंत ९ मृतदेह सापडले ६ मृतदेहांचा शोध सुरु

कराड : पाटण आंबेघर दुर्घटनेतील आतापर्यंत ९ मृतदेह सापडले असुन ३२ जनावरे दगावली आहेत .अजुन ६ मृतदेहांचा शोध सुरु आहे .सापडलेल्या मृतदेहावर जागेवरच पोस्टमार्टम करुन अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला. घरे झाडे कोसळून पडली आहेत . लहान बाळाचे मृतदेह पाहून उपस्थित लोकांना भावना आवरणे कठीण झाले होते.

गावकरी आणि एनडीआरएफ यांनी ९ मृतदेह आतापर्यंत शोधली आहेत. उर्वरित मृतदेह शोधण्याची मोहीम युध्द पातळीवर सुरू आहे.सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आंबेघरला भेट देऊन मदत कार्याची माहिती घेतली मदत कार्याचा वेग वाढवणार असुन आंबेघर गावाचे सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी लवकर निर्णय घेणार असल्याचे सांगितले

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version