तीन वर्षांत केवळ 69 जागा, MPSC परीक्षार्थींचा मोर्चा

तीन वर्षांत केवळ 69 जागा, MPSC परीक्षार्थींचा मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न सोडवण्याठी मोर्चा काढल्यानंतर आता पुण्यातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. पुण्यामध्ये राज्यसेवा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं तीन वर्षांत केवळ 69 जागांची जाहिरात काढली आहे. जागांची संख्या कमी असून जास्त जागांसाठी जाहिरात द्यावी अशी प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांची आहे. पुण्यात शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काढला होता. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात झाली.

पुण्यात एमपीएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

1) राज्यसेवेच्या पदांच्या संख्येत वाढ व्हावी.
2) संयुक्त परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणे PSI/STI/ASO ची स्वतंत्र परीक्षा घेऊन जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढावी
3) MPSC ने बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी
4) MPSC ने परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसवावेत
5) राज्य शासनाने प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावावी
6) MPSC ने तामिळनाडू पॅटर्न राबवावा
7)  तलाठी पदाची परीक्षा MPSC द्वारे घेऊन जास्तीत जास्त पदांची जाहिरात काढावी
8) MPSC ने C-SAT या विषयाचा पेपर UPSC च्या धर्तीवर पात्र करावा
9) स्पर्धा परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरणाची तपासणी सीबीआय मार्फत करण्यात यावी
10) आयोगाकडून जे प्रश्न चुकतात आणि रद्द करण्यात येतात त्याचे आयोगाने संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे
11) राज्य आणि जिल्हा पातळीवरील रिक्त जागा भरण्यात याव्यात

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version