पुण्यात राज्यसेवेच्या परीक्षार्थींचं पुन्हा आंदोलन

पुण्यात राज्यसेवेच्या परीक्षार्थींचं पुन्हा आंदोलन

राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम २०२५पासून लागू करण्याच्या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. ती मागणी नुकतीच मान्य झाली आहे. मात्र पुन्हा पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एमपीएससी तांत्रिक विभागाच्या परीक्षेचा पॅटर्न २०२५ पासून लागू करावा, या मागणीसाठी बुधवारपासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यभरातून विद्यार्थी पुण्यात येणार असल्याची माहिती असून त्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येतोय.

पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये बुधवारी हे विद्यार्थी उपोषणाला बसणार आहेत. सरकार जाणून-बुजून आम्हाला त्रास देत असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आणि सरकारला दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version