‘एमपीएससी डाटा लीकप्रकरणी चौकशी करावी’

‘एमपीएससी डाटा लीकप्रकरणी चौकशी करावी’

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ३० एप्रिल रोजी होणार आहे. तर, परिक्षेला अवघा एक आठवडा असताना परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) टेलिग्रामवर लीक झालं आहे. प्रवेशपत्रिकेसोबत विद्यार्थ्यांचे दूरध्वनी क्रमांक, आधारकार्ड क्रमांक आणि घरचा पत्तादेखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दि. ३० एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पुर्व परीक्षा गट ब आणि क यांची हॉल तिकीटे सोशल मिडीयावर लीक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची ही हॉल तिकीटे असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. हा अतिशय गंभीर विषय असून, माझी शासनाकडे मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.’

येत्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, ‘क’च्या परीक्षाचे हॉल तिकीट लीक करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची माहिती उघड झाली आहे. टेलिग्रामवर ऍपवर या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लीक झाले आहे. तसेच, संबंधित परीक्षेची प्रश्नपत्रिकादेखील असल्याचा दावा या ऍपवर करण्यात आला आहे. टेलिग्रामवर परीक्षेचा डेटा लीक झाल्याची माहिती मिळताच, आयोगाने दखल घेतली असून सायबर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसेच वस्तुस्थितीची पडताळणी केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, प्रश्नपत्रिका लीक होत नसताना, ते खोटे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्ण खरात यांनी दिली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट केले की, ‘जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version