बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान केले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरता आज खासदार प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत. संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यातील शेतीवर जाऊन शेतीच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली आहे. संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे या पावसाने मोठे नुकसान केले असून अनेक घरं या पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. तर हजारो हेक्टर शेती खरडून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरकारकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना खासदार जाधव यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.