मुंबई, ३ जुलै २०२३, प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवून आणला. रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी आपला वेगळा गट तयार केला. त्यांनतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांना पहिला धक्का बसला आहे. कारण शपथविधीला हजर असणारे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं आहे.
जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/2kAhkkfnjd — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2023
खासदार अमोल कोल्हे शरद पवारांसोबत
रविवारी शपथविधीसाठी उपस्थित असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे शरद पवारांसोबत आहेत,असं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच अमोल कोल्हे यांनी ट्वीट करुन आपली भूमिका जाहीर केली आहे. “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत” असं अमोल कोल्हे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अमोल कोल्हे शरद पवारांना भेटणार आहेत. मी शरद पवारांना भेटून माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.