शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन

राज्यात अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून काही ठिकाणी पूर महापूर देखील येऊन गेलेत, मात्र महाराष्ट्रातीलच सांगली जिल्यातील जत गावात पावसाची रिमझिम देखील सुरु झालेली नाही. जत गावातील नागरिक असमानाकडे डोळे लावून बसले आहेत तर शेतकरी देखील मोठ्या अडचणीत सापडला आहे.

जत तालुक्यातील आमदार विक्रम सामंत सातत्याने तालुक्यातील पाणी प्रश्न विधानभवनात मांडत आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचंही गावकऱ्यांनी सांगितलं आहे. गावातील नागरिकांना पाण्यासाठी दररोज वणवण करावी लागत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत तालुक्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असं त्यांनी सांगितलं होत, मात्र त्यात कोणतीही अंबलबजावणी होताना दिसत नाही असं देखील नागरिक बोलत आहेत.

या सगळ्या संघर्षातून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा या साठी मंगळवारी विश्वजित कदम यांच्या सह गावकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. शासनाने या पाणी टंचाईकडे शक्य तितके लवकर लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version